x
We will start accepting orders in the 4th week of September.
shivneri trek
  • rajmachi trek in maharashtra
  • rajmachi trek in maharashtra
  • rajmachi trek in maharashtra

किल्ले शिवनेरी ट्रेक / Shivneri Fort Trek

Rs.999 Rs.1,199
किल्ल्याची ऊंची: १०६७  / Height of the Fort: 1067 m.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: नाणेघाट / Fort Range: Naneghat
जिल्हा: पुणे / District: Pune
श्रेणी: मध्यम / Difficulty: Medium

या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण 

आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन याकार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे असा आपला मानस आहे. चला तर मग, एका adventure वर जाऊया!

This is a one day trek. General brief itinerary.
- We will leave from Pune, Deccan area, at around 5 am
- We will do breakfast during our journey to the fort at around 8 am
- We will start trekking the fort at around 10 am
- We will reach the fort top at around 12 pm
- We will see the fort and nearby sights till 3 pm
- Lunch will either be on the fort or at the base of the fort if we come down early
- We will leave the fort for Pune at around 5 pm
- We will be reaching Pune by 8 pm

शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय अनारक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
सातवाहनांनंतर शिवनेरीचालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.'
यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न राजे शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

Shivneri Fort Trek: All You Need To Know
Do you know what the birthplace of the great Chhatrapati Shivaji Maharaj is? Yes, it’s the Shivneri Fort. If you are looking for an amazing one-day trip and want a good trekking experience with your family and friends, then this might be the place for you. In order to reach the top, you need to cross about seven gates. You can explore a lot of things at the Shivneri fort, and it's the place that's considered to be the best for people who are in love with history.

How To Reach The Place?
If you count the distance from Central Pune, then this place is around 100kms far. You will need to head over to Junnar Village from Pune. If you decide to travel by your personal vehicle, you can easily take yourself to the foothills of the Shivneri Fort. Afterwards, you are required to park your vehicle. A special vehicle parking is available at the place. If you use public transport to reach the place, you will have to walk for about 2kms. From Junnar in order to reach the fort’s base.

What’s in Shivneri?
Let’s discuss the sightseeing at the Shivneri Fort:
- 7 Doors
- Badami Talav: It’s a giant water reservoir.
- Chhatrapati Shivaji Maharaj and Jijabai’s statue.
- Jamuna and Ganga
- Ambarkhana: It was previously utilized as food storage. Not just small food storage, but it was a gigantic one. Here, the people used to store food that could feed the stomachs of the people for about a year.
- Kadelot: This was the place where criminals were executed by throwing them off from the place as a punishment.
- Shivai Temple: Chhatrapati Shivaji’s name was born from Goddess Shivai. This temple has a statue of Goddess Shivai.

A History Lesson
As we mentioned earlier, this was the place where Chhatrapati Shivaji Maharaj took birth. His birthdate is 19th February 1930. Most of his childhood days were spent at this fort. This fort was really strong. That's the main reason why his father chose this place as his birthplace. About a total of 7 doors need to be crossed to reach the fort. During the old times, it was a tough job to cross all of them.

Accommodation Services & Food
Usually, camping at this fort is restricted. So, if you are looking for a camping trip, then you might be disappointed when you visit this place. You will be observing various caves at this fort. You can use them at the shelter at night if the camping's allowed. However, we want you to bring your personal tents. There's nothing like personal tents.
There are no good places to eat around this fort. Hence, we advise you to bring along with yourself some packaged food. You must carry enough water and food as you are going for trekking. If you visit this place, then you are in for a jaw-breaking experience. And hence, we want you to book your first trekking at this fort with us. And we know that if you choose us right now, you’ll be choosing us forever. So what are we simply waiting for? Let’s get our Shivneri fort trek started!

सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
1. पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
2. ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
3. टोपी / Cap
4. ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक / Sport Shoes with Good Grip
5. औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
6. कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
7. पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat 8. कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need
9. पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
10. दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
11. पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
12. सुरक्षा साहित्य / Pocket Knife

आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- +919823348087
For any questions or queries, please contact +919823348087