x
We will start accepting orders in the 4th week of September.
pratapgad trek
  • pratapgad trek in maharashtra
  • pratapgad trek in maharashtra
  • pratapgad trek in maharashtra

किल्ले प्रतापगड ट्रेक / Pratapgad Fort Trek

Rs.999 Rs.1,199
किल्ल्याची ऊंची: ३५५६ / Height of the Fort: 3556 ft.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: महाबळेश्वर / Fort Range: Mahabaleshwar
जिल्हा: सातारा / District: Satara
श्रेणी: सोपी / Difficulty: Easy

या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण 

आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन याकार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे असा आपला मानस आहे. चला तर मग, एका adventure वर जाऊया!

This is a one day trek. General brief itinerary.
- We will leave from Pune, Deccan area, at around 5 am
- We will do breakfast during our journey to the fort at around 8 am
- We will start trekking the fort at around 10 am
- We will reach the fort top at around 12 pm
- We will see the fort and nearby sights till 3 pm
- Lunch will either be on the fort or at the base of the fort if we come down early
- We will leave the fort for Pune at around 5 pm
- We will be reaching Pune by 8 pm

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात.आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.

Pratapgad Fort Trek: All You Need To Know
Also called as Pratapgarh, Pratapgad fort was built around 16th century. Chhatrapati Shivaji Maharaj, who was a great Maratha Warrior as we all know it, built this fort during that time.
This fort is situated at a distance of about 24kms from Mahabaleshwar. This fort is a really great place to visit for the people who would like to explore more alongside Mahabaleshwar. Alongside the great historical importance of this hill fort, this fort has become a famous attraction spot for the tourists. If you are worried about nature at this fort, you need not worry. You will find nature to be perfect at any time of the year. And that's the sole reason why a lot of people visit this place without even considering the season.

Pratapgad Fort Trek Routes
If you are someone from Pune, you might know how famous this fort actually is. You might be aware of the route from Mahabaleshwar. This fort is situated at a distance of only 24kms from Mahabaleshwar itself. You will find the roads to be in pretty good shape. If you ask the locals about this fort, they will be more than happy to help you with the route. And everyone nowadays has access to GPS. With the help of Google Maps, you can easily have the directions to the fort from your place in no time. If you plan to visit this place on your own vehicle, you should search for Wada Village as you will be parking your vehicles at this village.

Pratapgad Fort Trek Tips
This trek won't be too hard for you. All you need to cover is just 450 steps in order to reach the top. This trek isn't quite difficult at all, and if you even aren't an experienced trekker, you won't be facing any kinds of problems with trekking. However, a good piece of advice that we will give you is for you to carry around 2-3 litres of water along with you for a single person.

Sightseeing On Pratapgad Fort


- The entrance of Bale Killa

- Watch Towers on the fort

- Statue of Chhatrapati Shivaji Maharaj

- Bastions on the fort

- Beautiful Sahyadri Mountains surrounding the fort

- Afzal Buruj

- Bhavani Temple

- Afzal Khans Tomb

- Rahat Lake a Biggest lake on the fort



Pratapgad Fort Camping Information
There isn't any accommodation facility available anywhere near the forts. Hence, you recommend you to bring your own tents with you. You can enjoy your camping on the fort in Mahadev temple. However, you should take into consideration that you won't get a place for camping if you are visiting the place during the weekend. We will recommend you to take along with yourself enough water and snacks for the trip. The locals will be more than happy with assisting you with the firewood.

सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
1. पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
2. ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
3. टोपी / Cap
4. ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक / Sport Shoes with Good Grip
5. औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
6. कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
7. पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat 8. कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need
9. पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
10. दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
11. पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
12. सुरक्षा साहित्य / Pocket Knife

आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- +919823348087
For any questions or queries, please contact +919823348087